Wednesday, May 21, 2008

मुच्युअल फंडचे प्रकार

मुच्युअल फंड प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात॰ क्लोज एन्डेड़ आणि ओपन एन्डेड़॰ क्लोज एन्डेड़ फंड हे एकदा गुंतवणुक केल्या नंतर तीन वर्षे पैसे काढू शकत नाही॰ ओपन एन्डेड़ फंड मध्ये तुम्ही केव्हाही पैसे गुंतवू किंवा काढू शकता॰

मुच्युअल फंड कंपन्या विविध फायनान्शिअल गोल प्रमाणे अनेक स्कीम राबवतात आणि त्या सेबी कडून संमत असतात. यात इक्विटी फंड, सेक्टर फंड, बँलन्स फंड, देब्ट फंड, मनी मार्केट फंड असे अनेक प्रकारचे फंड असतात. यात इक्विटी आणि सेक्टर फंड हे हाय रिस्क मध्ये मोडतात तर बँलन्स फंड मध्ये मिडियम रिस्क असते. देब्ट आणि मनी मार्केट फंड हे इतरांपेक्षा कमी धोकादायक असतात.

परंतु यात मोबदला मात्र इक्विटी आणि सेक्टर फंड मध्ये जास्त, बँलन्स फंड मध्ये मध्यम तर देब्ट आणि मनी मार्केट फंड मध्ये सर्वात कमी असते.

No comments: